Team Agrowon
केळी सोलण्याच्या यंत्राची ताशी ४५० केळी एका दिवसात सोलण्याची क्षमता आहे. यंत्राच्या साह्याने ०.३ ते ०.५ मि.मी. जाडीच्या चकत्या कापाव्यात. यंत्र उपलब्ध नसल्यास स्टीलच्या चाकूने गोल, पातळ काप करावेत. साध्या चाकूने काप केल्यास ते काळे पडतात.
काप काळसर पडून नयेत व ते पांढरेशुभ्र होण्यासाठी ०.१ टका सायट्रिक अॅसिड किंवा पोटॅशिअम मेटाबाय सल्फाइडच्या द्रावणात १५ ते २० मिनिटे बुडवून ठेवावेत. नंतर चकत्या उकळत्या पाण्यात ४ ते ५ मिनिटे थंड करून प्रति किलो चकत्यास ४ ग्रॅम या प्रमाणात गंधक घेऊन त्याची धुरी द्यावी.
पूर्ण पक्व केळ्यांचा पल्पर यंत्राने गर काढतात. गर घट्ट असल्याने सर्वसाधारण स्वरूपात रस काढता येत नाही. त्याकरिता पाच मि.लि. प्रतिकिलो या प्रमाणात पेक्टीनेज एन्झाइम मिसळून दोन तास ठेवल्यानंतर स्वच्छ रस सहज मिळतो.
पूर्ण पिकलेल्या केळीचा वापर जॅम तयार करण्यासाठी करता येतो. गराच्या वजनाएवढी साखर मिसळून गर मंद आगीवर शिजवावा. साखर पूर्णपणे विरघळल्यावर ०.५ टक्का पेक्टीन, ०.३ टक्का सायट्रिक आम्ल व रंग टाकून मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवावे.
केळीच्या भुकटीला परदेशात भरपूर मागणी आहे. भुकटी तयार करण्यासाठी पूर्ण पिकलेली केळी वापरतात.
धुरी प्रक्रियेमुळे केळीच्या कापांना आकर्षक सोनेरी छटा येते, तसेच सुकेळीची प्रतदेखील उंचावते. असे काप सुकवून प्लॅस्टिक पिशव्यांमध्ये किंवा निर्जंतुक केलेल्या बरणीत भरावेत.