Anuradha Vipat
सिट-अप्स हा पोटाचे स्नायू बळकट करण्यासाठी आणि पोटाची चरबी कमी करण्यासाठी अत्यंत लोकप्रिय व्यायाम आहे.
अनेक जण हा व्यायाम करताना नकळतपणे गंभीर चुका करतात, ज्यामुळे पोटावर ताण येण्याऐवजी मान आणि पाठीचा कणा दुखावला जाऊ शकतो.
जमिनीवरून वर उठताना अनेक जण हाताने डोके किंवा मान पुढे ओढतात. यामुळे मानेच्या स्नायूंना गंभीर इजा होऊ शकते.
घाईगडबडीत सिट-अप्स मारल्याने स्नायूंवर ताण पडत नाही, तर शरीराच्या गतीचा वापर होतो, ज्यामुळे व्यायामाचा फायदा मिळत नाही.
वर येताना पाठ एकदम सरळ किंवा ताठ ठेवल्याने खालच्या पाठीवर जास्त दाब पडतो.
योगा मॅटवर पाठीवर सरळ झोपा. पाय गुडघ्यात दुमडा आणि पावले जमिनीवर सपाट ठेवा.
हात छातीवर क्रॉस करून ठेवा किंवा दोन्ही हातांची बोटे कानाच्या मागे हलकी स्पर्श करतील अशी ठेवा .
श्वास सोडत पोटाच्या स्नायूंना घट्ट करा आणि हळूवारपणे डोके, खांदे आणि पाठ जमिनीवरून वर उचला. तुमच्या गुडघ्यांपर्यंत पूर्णपणे वर या. वर आल्यानंतर १ सेकंद थांबा आणि श्वास घेत हळूहळू पाठीला पुन्हा जमिनीवर टेकवा.