Swapnil Shinde
जगभरात झाडांचे बरेच प्रकार आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे झाडे मिळतात.
पण तुम्हाला असं एक झाडं माहितीय का जे आपल्या खोडात लाखो लिटर पाणी साठवून ठेवते.
बाटलीसारख्या दिसणाऱ्या या झाडाचे नाव बाओबाब आहे.
लोक त्याला बोआब, बोबोआ, बॉटल ट्री आणि अपसाइड डाउन ट्री या नावांनी देखील ओळखले जाते.
मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील मांडू हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जिथे बाओबाबची झाडे विपुल प्रमाणात आढळतात.
हे झाड मोठे झाल्यावर त्याचे खोड लाखो लिटर पाणी साठवले जाते. हे पाणी पाऊस नसलेल्या भागात अनेक महिने पिण्यासाठी वापरले जाते.