Anuradha Vipat
कार्बोहायड्रेट्सचे सेवन पूर्णपणे बंद करणे हानिकारक असू शकते. संतुलित आहाराचा भाग म्हणून कार्बोहायड्रेट्सचे सेवन करणे महत्वाचे आहे
कार्बोहायड्रेट्समध्ये फायबर असते, जे आतड्यांच्या कार्यासाठी आवश्यक आहे. ते पूर्णपणे बंद केल्यास बद्धकोष्ठता होऊ शकते.
कार्बोहायड्रेट्स पूर्णपणे बंद केल्यास शरीराला आवश्यक पोषक तत्वांची कमतरता भासू शकते.
कार्बोहायड्रेट्स आतड्यांतील निरोगी बॅक्टेरियासाठी अन्न म्हणून काम करतात. ते पूर्णपणे बंद केल्यास पचनक्रियेत बदल होऊ शकतात.
काही अभ्यासानुसार कार्बोहायड्रेट्स कमी केल्याने तणाव आणि चिंता वाढू शकते.
सुरुवातीला वजन कमी होऊ शकते कारण शरीरातील साठवलेले कार्ब वापरले जातात.
कार्बोहायड्रेट्स शरीरासाठी मुख्य ऊर्जा स्त्रोत आहेत. ते पूर्णपणे बंद केल्यास, शरीर पुरेसा ऊर्जा मिळवू शकत नाही