Roshan Talape
सकाळच्या वेळेस हिरवळीवर अनवाणी चालल्यामुळे शरीराला वातावरणातील शुद्ध हवा मिळते यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते.
हिरवळीवर पाहत चालल्याने डोळ्यांना आराम मिळतो, आणि दृष्टीदोष कमी होण्यास मदत होते.
सकाळच्या नैसर्गिक संपर्कामुळे शरीराचे रोगप्रतिकारक यंत्रणा मजबूत होते आणि वारंवार आजार होण्याचे प्रमाणही कमी होते.
शांत वातावरणात चालल्याने मानसिक तणाव कमी होतो, मन स्थिर राहतं. पायांच्या तळव्यांवरील प्रेशर पॉइंट्स सक्रिय होतात.
अनवाणी चालल्याने पायांचे स्नायू बळकट होण्यास मदत होते आणि त्यामुळे नैसर्गिक व्यायाम मिळतो.
अनवाणी चालल्याने रक्ताभिसरण सुधारते, विशेषतः पायांमध्ये आणि हृदयापर्यंत रक्त पुरवठा सुरळीत राहतो.
पायांखालच्या विशिष्ट बिंदूंवर दाब पडल्याने पचनक्रिया सक्रिय होते आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.