Anuradha Vipat
किशोरवयीन मुलांमध्ये धूम्रपान आणि सिगारेटच्या सवयीत वाढ होण्यामागे अनेक कारणं आहेत.
सोशल मीडियावर धूम्रपान आणि ई-सिगारेटचे आकर्षक जाहिराती येतात, ज्यामुळे किशोरवयीन मुले आकर्षित होतात.
तंबाखूमध्ये निकोटीन असते, जे अत्यंत व्यसन लावणारे रसायन आहे.
काही किशोरवयीन मुले नैराश्याच्या काळात धूम्रपान करतात.
ADHD सारख्या आरोग्यविषयक समस्या असलेल्या मुलांना धूम्रपान किंवा ई-सिगारेट वापरण्याची शक्यता जास्त असते.
जर कुटुंबातील सदस्य धूम्रपान करत असतील, तर मुलांनाही धूम्रपान करण्याची शक्यता जास्त असते.
किशोरवयीन मुले अनेकदा त्यांच्या मित्रांच्या दबावाखाली येतात आणि त्यांच्यासारखे दिसण्याचा किंवा वागण्याचा प्रयत्न करतात.