Swapnil Shinde
आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाण्यासाठी संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून शनिवारी (१० जून) दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली आहे.
ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आळंदीतून रविवारी प्रस्थान होणार आहे.
टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात लाखो वारकरी देहू आणि आळंदीत दाखल झाले आहेत.
तर, ऊन वारा पावसाची पर्वा न करता विठूनामाचा गजर करत यापूर्वीच काही दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या आहेत.
पालखी प्रस्थान सोहळा पाहण्यासाठी आणि दर्शन घेण्यासाठी राज्याच्या काना-कोप-यातून वारकरी आले आहेत.
दिंड्याच्या फडावर रात्रभर जागर, पहाटे काकड आरती, महापुजा, हरिपाठ वीणा- टाळ -मृदंग यांच्या साथीत भजन किर्तनासह हरिनामाच्या जयघोषात सारे वैष्णव दंग झाले आहेत.
राज्यभरात आषाढी वारीच्या निमित्तानं उत्साहाचं वातावरण आहे.