Anuradha Vipat
नखांवर असलेल्या रेषा तुमच्या आरोग्याबद्दल काही संकेत देऊ शकतात.
या रेषा गंभीर आजार, दुखापत किंवा शरीराला झालेला धक्का दर्शवू शकतात, ज्यामुळे नखांची वाढ तात्पुरती थांबते.
उभ्या रेषा लोहाच्या कमतरतेमुळे किंवा मूत्रपिंडाच्या आजारामुळे असू शकतात.
नखांवर पांढऱ्या रेषा किंवा डाग दिसल्यास, तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता आहे किंवा किडनीचे आजार आहेत असे समजावे
नखांवर या रेषा आघात, संसर्ग किंवा औषधांमुळे देखील होऊ शकतात.
नखांवर काळ्या रेषा शरीरात व्हिटॅमिन सी, झिंक आणि इतर पोषक तत्वांची कमतरता दर्शवतात.
नखांवर लांब आणि पांढऱ्या बारीक रेषा दिसणे हे वृद्धत्वाचे लक्षण आहे