डॉ. सोमिनाथ घोळवे
घरासमोरच्या शेतातील कडुलिंबाच्या झाडाला एकाच वेळी लिंबोळ्या आणि तौर (फुलं) आला आहेत. हा हवामान बदलाचे परिणाम असल्याचे सहज दिसून येतो.
कारण कडुलिंबाच्या झाडाला मार्च महिन्याच्या शेवटी पालवी आणि तौर येतो. नंतर हळूहळू निंबोळ्या तयार होऊन जून-जुलै महिन्यात परिपक्व होतात.
ह्या लिंबोळ्या पिकल्या असता, अर्क तयार करण्यासाठी वेचल्या जातात. नंतर अर्क तयार करून पिकांवरील विविध रोगराई निर्मूलन आणि औषधे निर्मितीच्या वापरासाठी वापरली जातात.
(गुडीपाडव्याला गुडी उभारता कडुलिंबाच्या पाला वापरतो, त्यावेळी तौर (फुले) आलेला असतो. ती फुले गुळात मिक्स करून प्रसाद वाटला जातो)
हवामान बदलाचा परिणाम निसर्ग विविध माध्यमातून दाखवतो, अनेक संकेत देत असतो. वेळीच आपण ते समजून घ्यायला हवे. या बदलानुसार व्यवस्थेच्या पुढाकाराने जागृती करून बदल करून घ्यावेत.
तसेच निसर्गावर जास्त मानवनिर्मित आक्रमण होणार नाही. ही काळजी घ्यायला हवी. जर तसे केले नाहीतर पुढील येणाऱ्या संकटांना, दुष्परिणामांचा सामना करावा लागणार. उच्च मध्यम आणि श्रीमंत वर्ग सामना करू शकतील. हे दुष्परिणाम सर्वसामान्यांना पेलवतील का?