Anuradha Vipat
ब्युटी पार्लरमध्ये आयब्रो करणे जीवघेणे ठरू शकते, ही भीती केवळ अफवा नसून त्यामागे एक अत्यंत गंभीर वैज्ञानिक कारण आहे.
निष्काळजीपणामुळे आयब्रो केल्याने लिव्हर फेल होण्याचा आणि हिपॅटायटीस बी किंवा सी सारख्या धोकादायक आजारांचा संसर्ग होण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.
थ्रेडिंग करताना दोऱ्याच्या घर्षणामुळे किंवा केस मुळापासून उपटताना त्वचेवर अगदी बारीक, डोळ्यांना न दिसणाऱ्या जखमा किंवा ओरखडे पडतात.
जर ब्युटी पार्लरमध्ये थ्रेडिंग करणारी व्यक्ती दोरा तोंडात धरून काम करत असेल, तर लाळेतील हिपॅटायटीसचे विषाणू त्या दोऱ्यावर राहू शकतात.
जेव्हा तोच दोरा तुमच्या त्वचेवरील सूक्ष्म जखमांच्या संपर्कात येतो, तेव्हा हे विषाणू थेट तुमच्या शरीरात प्रवेश करतात.
हिपॅटायटीस बी आणि सी हे थेट यकृतावर हल्ला करतात. अनेकदा याची लक्षणे लगेच दिसत नाहीत.
काही महिन्यांनी किंवा वर्षांनी यामुळे लिव्हर इन्फ्लेमेशन, सिरोसिस आणि तीव्र प्रकरणांमध्ये लिव्हर फेल्युअर होऊ शकते. .