Anuradha Vipat
तुम्हालाही दुपारी झोपण्याची सवय असेल तर गंभीर आजार होऊ शकतात ज्यामुळे तुमच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
पुरेशी झोप न घेतल्यास किंवा जास्त वेळ झोपल्यास मधुमेहचा धोका वाढू शकतो.
जेवणानंतर लगेच झोपल्यास पचनक्रिया बिघडते. त्यामुळे अपचन, ऍसिडिटी आणि इतर पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
दुपारी झोपल्याने कफ, शिंका येणे आणि अंगात आळस येऊ शकतो.
दुपारी जास्त वेळ झोपल्यास रात्रीच्या झोपेच्या वेळेत व्यत्यय येऊ शकतो. यामुळे शरीराची नैसर्गिक झोपण्याची लय बिघडू शकते.
पुरेशी झोप न घेतल्यास किंवा जास्त वेळ झोपल्यास लठ्ठपणाचा धोका वाढू शकतो.
पुरेशी झोप न मिळाल्यास किंवा जास्त वेळ झोपल्यास नैराश्य आणि चिंतेसारख्या समस्या उद्भवू शकतात