Team Agrowon
गहू दरवाढ रोखण्यासाठी सरकारनं आता ३० लाख टन गहू खुल्या बाजारात विकण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिगटाच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
गव्हाचे दर २ हजार ७०० रुपयांवर पोचल्यानंतर प्रक्रिया उद्योगानं सरकारला खुल्या बाजारात गहू विकण्याची मागणी केली होती.
देशातील बाजारात गव्हाचा सरासरी भाव ३ हजार ते ३ हजार ३०० रुपयांच्या दरम्यान आहे.
देशातील गहू बाजारात येण्यास आणखी दोन महिन्यांचा कालावधी आहे.
केंद्र सरकार सहकारी संस्था, फेडरेशन, केंद्रीय भंडार आदी संस्थानाही सवलतीच्या दरात गहू देण्यात येणार आहे.
सरकार गहू पीठ गिरण्या, घाऊक खरेदीदार आणि इतर मोठ्या ग्राहकांना ई-लिलावाद्वारे गहू देण्यात येणार आहे.
यंदाच्या हंगामात सरकारने गव्हासाठी २ हजार १२५ रुपये हमीभाव जाहीर केला आहे.