Team Agrowon
दूध उत्पादनात तूट असलेला देश ते जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश हे भारताचे स्थित्यंतर घडवून आणण्यात वर्गीस कुरियन यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
देशात 'दुधाचा महापूर' योजनेची संकल्पना त्यांनीच मांडली.
आज म्हणजेच २६ नोव्हेंबर रोजी डॉ. वर्गीस कुरियन यांचा जन्मदिवस 'नॅशनल मिल्क डे' म्हणून साजरा केला जातो. डॉ. वर्गीज कुरियन यांचा जन्म २६ नोव्हेंबर १९२१ मध्ये झाला होता.
डॉ. कुरियन यांच्या नेतृत्वाखाली 'एनडीडीबी' ने 'ऑपरेशन फ्लड' (धवल क्रांती) सुरु केलं.
देशाला दुध उत्पादनात स्वयंपूर्ण करण्याव्यतिरिक्त, वर्गीज कुरियन यांनी शेतकर्यांची स्थिती सुधारण्यासाठी याची सुरूवात केली. कुरियन यांना 'मिल्कमन ऑफ इंडिया' म्हणूनही ओळखले जाते.
अवघ्या चार दशकांतच भारत हा जगातील सर्वाधिक दूध उत्पादन करणारा देश बनला. कुरियन यांनी गुजरात सहकारी दुग्ध पणन महासंघाची (जीसीएमएमएफ) स्थापना केली.
डॉ. कुरियन यांनी म्हशीच्या दुधाची भुकटी तयार करण्याची किमया साधली. यामुळे भारतात दूध प्रक्रिया क्षेत्रात क्रांती झाली. यामुळे जगात अग्रेसर असलेल्या 'नेस्ले' कंपनीला 'अमूल' टक्कर देऊ शकली.