Team Agrowon
खोलीला २५ किलो वजनाचा दरवाजा केला आहे. तो हायड्रोलिक पद्धतीने उघडण्यासाठी किंवा बंद होण्यासाठी दोन हायड्रोलिक सिलिंडर बसवले आहेत. या सहा माणसे बसू शकतो किंवा दोन व्यक्ती आडव्या झोपू शकतात.
-शेती निवारा कक्षात प्रकाशासाठी १२ वॉट क्षमतेचे चार एलईडी दिवे बसवले आहेत. उन्हाळ्यात तापमान नियंत्रण व थंड हवेसाठी दोन्ही बाजूंस दोन फॅन लावले आहेत.
निवारा कक्षाच्या खालील बाजूस झुला लावला आहे. दिवसा कामातून विरंगुळा म्हणून त्यावर बसण्याचा आनंद घेता येतो.
पावसाळ्यात शेतशिवारात वीज पडून अपघाताचे प्रकार घडतात. ते रोखण्यासाठी खास वीजरोधक यंत्रणा मचाणावर बसवली आहे. कॉपर ॲंटेनापासून अर्थिंग काढून ती जमिनीत गाडली आहे. यामुळे २० ते २५ फूट परिसरात वीज पडण्यापासून बचाव शक्य होत असल्याचे योगेश यांनी सांगितले.
लोखंड व एनऐट शीटने मचाण बनवले आहे. उन्हाळ्यात ते गरम होऊ नये, यासाठी कारमध्ये वापरल्या जाणाऱ्या हिटलॉनचा वापर येथे केला आहे. यामुळे निवारा कक्षातील तापमान नियंत्रित राहते.
या संपूर्ण निवारा कक्षाचे वजन ५०० किलो असून, सर्व सुविधांसह त्याची किंमत ८५ हजार रुपये इतकी होते.