Team Agrowon
आज पहिल्यांदा शेततळ्यातील पाण्याचा वापर झाला.
दोरी बांधलेलं छोट बकेट आत फेकून ओढायचं.प्रत्येक खड्ड्याला एक बकेट.६५ ॲंगलच्या कॉक्रीटला पाणी पाजलं.
शेततळ्यात एक पानकोंबडी(की कोंबडा) आलीय. ती मस्तच पोहते.माझ्याकडं बघून तिचे नखरे चालू होते...ये पाण्यात...असं ती म्हणत होती....मी म्हटलं,सॉरी...मी पक्षी नाही..माणूस आहे..रिकामपण मिळालं की बघू.
साधारण पाऊण तास लागला.उन्हात हे काम करताना मजा आली. पाणी काढताना तोल जाऊन पडण्याची भीती आहे.
पण त्याची चिंता नाही..तेवढंच निमित्त मिळेल पाण्यात उतरायला.
आजपासून तीन दिवस हेच मुख्य काम.