Swapnil Shinde
खरीप हंगामात राज्यात बहुतांशी क्षेत्रावर सोयाबीन पिकांची पेरणी झाली आहे.
ऑगस्ट महिन्यात पावसाचा खंड पडल्याने त्याचा पिकाच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला.
पिक फुलोरा अवस्था ते शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे त्यावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.
काही ठिकाणी सोयाबिनवर शेंगावरील करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसुन येत आहे.
या रोगाचे नियंत्रणाकरीता टेबुकोनॅझोल १० टक्के, सल्फर १० टक्के २५ ग्रॅम, १० लिटर पाणी किंवा प्ल्युक्झापायरोझाड १.६७ आणि पायरोक्लोयस्ट्रॉबिन ३.३३ टक्के ६ मिली १० लीटर पाण्यात घेऊन फवारणी करावी. असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केले आहे.