Team Agrowon
फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे. उन्हाळ्याची चाहूल लागताच आपल्याला सगळीकडे आंबेच आंबे पाहायला मिळतात.
आंबा भारतात सर्वत्र व जगातील अनेक देशांत होतो. पण कोकणातल्या हापूस आंब्याला वेगळाच मान आहे.
दरवर्षी हापूस आंब्यांची सर्वजण आतुरतेने वाट पाहतात. विशेषतः अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर हापूसचा सुगंध दरवळत असतो.
कोकणातील हापूसच्या जोडीला कर्नाटकमधील आंबे बाजारात दाखल होताच आंब्याचे दर कमी होऊ लागतात.
मे महिन्यापासून बाजारात गुजरातमधून लांबड्या केसर आंब्याची आवक बाजारात सुरू झाली आहे
केसर दिसायला पिवळागार आणि आकाराने थोडासा लांबुट आणि टोकदार असतो. हा आंबा चवीलाही गोड असतो. हापूसनंतर आंब्यामध्ये केसर आंब्याला अधिक मागणी असते.
गुजरातच्या जुनागड, वलसाड, वापी, धरमपूर, देगाम या ठिकाणांहून मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात केसर आंबा दाखल होत आहे. त्यामुळे कोकणातील हापूसची मागणी घटली आहे