Avocado Cultivation : भारतीय फळबाजारात अॅवोकॅडोची चलती

Team Agrowon

लागवड वाढीसाठी प्रयत्न

अॅवोकॅडो नावाच्या विदेशी फळाची लागवड राज्यात वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले आहेत. एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व आत्मा यंत्रणेने त्यासाठी संयुक्त प्रयत्न सुरू केले आहेत.

Avocado Cultivation | Agrowon

अॅवोकॅडो मूळ धरतोय

भारतीय फळबाजारात अॅवोकॅडो मूळ धरतो आहे. २०२१ मध्ये १३ कोटी रुपयांचे विदेशी अॅवोकॅडो विकले गेले होते.

Avocado Cultivation | Agrowon

विक्रीत वाढ

ही विक्री सतत वाढते आहे. देशात गेल्या वर्षी म्हणजे २६ कोटींचे तर चालू वर्षात ५० कोटींचे अॅवोकॅडो विकले गेले. भरपूर प्रथिने, व्हिटॅमिन्स असलेल्या या फळांचे व्यापारी उत्पादन घेण्यास राज्यातील भौगोलिक स्थिती अनुकूल आहे.

Avocado Cultivation | Agrowon

हेक्टरी दीड लाख रुपये अनुदान

राज्यात अॅवोकॅडोच्या बागा वाढविण्यास संधी असल्याचे येताच हेक्टरी दीड लाख रुपयांपेक्षा जास्त लागवड अनुदान देण्याचे यापूर्वीच जाहीर केले गेले आहे.

Avocado Cultivation | Agrowon

महाडीबीटीच्या ऑनलाइन संकेतस्थळावर सुविधा

शेतकऱ्यांना अॅवोकॅडो उभारणीसाठी अनुदान अर्ज दाखल करता येण्याकरिता राज्याच्या कृषी विभागाने महाडीबीटीच्या ऑनलाइन संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

Avocado Cultivation | Agrowon

अॅवोकॅडोला जागतिक बाजारात चांगली मागणी

मूळ अमेरिकेचे फळ असलेल्या अॅवोकॅडोला जागतिक बाजारात चांगली मागणी आहे. या फळात उत्तम पोषणमूल्य असलेले भरपूर घटक आहेत. फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांनी राज्यात अॅवोकॅडोच्या बागा वाढविण्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Avocado Cultivation | Agrowon

५० हेक्टरवर अॅवोकॅडोच्या बागा

राज्यात सध्या अंदाजे ५० हेक्टरवर अॅवोकॅडोच्या बागा उभारल्या गेल्या आहेत. नाशिक, पुणे, कोकणासह मराठवाड्यात बीडसारख्या भागातील शेतकरीदेखील अॅवोकॅडो लागवडीत पुढे येताना दिसत आहेत.

Avocado Cultivation | Agrowon
Soybean Disease | Agrowon
आणखी पाहा...