Team Agrowon
ज्वारीमध्ये प्रथिने, तंतुमय पदार्थ, खनिज द्रव्य, कॅल्शिअम, कॅरोटीन, थायामीन मुबलक प्रमाणात असते.
हुरड्याच्या दाण्यांमध्ये मुक्त अमिन आम्ल, साखर, विद्राव्य प्रथिने, जीवनसत्वे यांचे प्रमाण अधिक असून पिष्टमय पदार्थांचे प्रमाण कमी असते.
महाराष्ट्रामध्ये खास करून अवर्षण प्रवण क्षेत्रामध्ये ज्वारीचे पीक घेतले जाते. ज्वारीचा वापर प्रामुख्याने धान्य व जनावरांसाठी कडबा म्हणून केला जातो.
ज्वारीच्या दाण्यातील गुणप्रत अनेक भौतिक रासायनिक व प्रक्रिया तंत्रज्ञानाच्या बाबींवर अवलंबून असते.
आपल्याकडे ज्वारीचा उपयोग भाकरी बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तथापि काही ज्वारीच्या वाणांचा उपयोग इतर अनेक खाद्यपदार्थ बनवण्यासाठी केला जातो.
आहारदृष्ट्या ज्वारीच्या दाण्यात ०८ ते १०% आर्द्रता, ९.४ ते १०.४% प्रथिने, तंतुमय पदार्थ १.२ ते १.६%, खनिज द्रव्य १.० ते १.६ %, कॅल्शिअम २९ मिलिग्रॅम, कॅरोटीन ४७ मिलिग्रॅम, थायमिन ३७ मिलिग्रॅम प्रति १०० ग्रॅम या प्रमाणात असते.
सध्या मानवी आरोग्य विषयी जागरूकता वाटत असल्यामुळे ज्वारीच्या खाद्यपदार्थांना चांगली मागणी आहे.