Anuradha Vipat
हिवाळ्यात कोरड्या हवेमुळे त्वचेसोबतच नखांमधील ओलावाही कमी होतो, ज्यामुळे नखे ठिसूळ होऊन वारंवार तुटू लागतात.
थंडीच्या दिवसांत नखांना मजबूत, निरोगी आणि चमकदार ठेवण्यासाठी काही सोप्या घरगुती टिप्स येथे जाणून घ्या.
रोज रात्री झोपण्यापूर्वी कोमट खोबरेल तेल, बदामाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइलने नखे आणि नखांभोवतीच्या त्वचेला५ मिनिटे मसाज करा.
हात धुतल्यानंतर प्रत्येक वेळी हातांना आणि नखांना चांगले हँड क्रीम किंवा व्हॅसलीन लावा. यामुळे नखांमधील ओलावा टिकून राहतो.
हिवाळ्यात थंड पाणी आणि साबणातील रसायनांमुळे नखे अधिकच कोरडी होतात. त्यामुळे भांडी किंवा कपडे धुताना रबरी हातमोजे वापरण्याची सवय लावा.
नखे खूप लांब वाढवू नका, कारण हिवाळ्यात ती लवकर अडकून तुटतात. नखे कापल्यानंतर नेल फायलरने एकाच दिशेने घासून त्यांना गोल आकार द्या.
ॲसिटोन असलेल्या नेलपेंट रिमूव्हरमुळे नखे अत्यंत कोरडी पडतात. आठवड्यातून एकदाच 'ॲसिटोन-फ्री' रिमूव्हर वापरा आणि नेलपेंट काढल्यावर लगेच तेल लावा.