Poultry Feed : कोंबड्यातील खनीज कमतरतेची लक्षणे कशी ओळखायची

Team Agrowon

कॅल्शिअम च्या कमतरतेमुळे पातळ कवचाचे किंवा कवचहीन अंडे तयार होतात. अंडी उत्पादन आणि अंडी उबवणीचे प्रमाण कमी होते तसेच कोंबड्यांची वाढ खुंटते. 

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon

स्फुरद (फॉस्फरस) च्या कमतरतेमुळे हाडे नाजूक व ठिसूळ होतात. अंडी उत्पादन कमी होऊन वाढ खुंटते. 

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon

भूक मंदावणे, अंग थरथरणे, पाय जड होणे, त्वचा खरबरीत व जाड होणे इ. लक्षणे मॅग्नेशिमच्या कमतरतेमुळे अढळून य़ेतात. 

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon

झिंक कमतरतेमुळे पंखाची वाढ कमी होते, पायाची हाडे आखूड होतात व पायाचा जॉईंट सुजतो.  

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon

मांसल भागावर पांढरे पट्टे दिसने, मांसामध्ये रक्ताचे डाग दिसने इ. लक्षणे सेलेनिअमच्या कमतरतेमुळे दिसून येतात.

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon

मॅंगेनीज च्या कमतरतेमुळे पाय बाहेरील बाजूस वळतात, पायाला सूज येते, पातळ कवचाचे किंवा कवचहीन अंडे, अंडी उबवणीचे प्रमाण कमी होते.

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon

सोडियम व पोटॅशिअम च्या कमतरतेमुळे चोचीची वाढ होत नाही.  

symptoms of mineral deficiency in chicken | Agrowon
cta image | Agrowon