Team Agrowon
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू श्री तुकाराम महाराज यांच्या पालखींचा दोन दिवस पुण्यात मुक्काम होता
पालखी दिवे घाटात
पुण्यातील दोन मुक्काम संपवून आज सकाळी दांड्या दिवे घाटाच्या दिशेने मार्गस्थ झाल्या
टाळ-मृदंगांचा गजर… हाती भगव्या पताका… मुखी ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’ असा जयघोष करीत मार्गक्रमण करणाऱ्या वारकऱ्यांमुळे पुण्यातील वातावरण भक्तिमय झाले होते.
पालखी सोहळ्यात शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी देखील दिंडीत पंगत सेवा दिल्याचे पाहायला मिळाले.
सुषमा अंधारे यांनी दिंडीतील वारकऱ्यांसाठीच्या पंगत सेवेदरम्यान चपात्या लाटतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये सुषमा अंधारे या वारकरी महिलांसोबत मोठ्या चपळाईने चपात्या लाटताना दिसत आहेत.
या फेसबुकवर शेअर करण्यात आलेल्या या व्हिडोओवर लोक लाइक्स आणि कमेंट करत आहेत.