Anuradha Vipat
सकाळी रिकाम्या पोटी गूळ आणि गरम पाणी पिणे हे आरोग्यासाठी अमृतासारखे काम करते.
गुळामध्ये मुबलक प्रमाणात लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, तर गरम पाणी शरीराला डिटॉक्स करण्यास मदत करते.
जर तुम्हाला गॅस, अॅसिडिटी किंवा बद्धकोष्टतेचा त्रास असेल, तर गरम पाण्यासोबत गूळ खाणे अत्यंत फायदेशीर आहे.
सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळी वाढते. यामुळे अॅनिमिया सारख्या आजारापासून आराम मिळतो.
सकाळी गरम पाण्यासोबत गूळ घेतल्यास शरीरातील अतिरिक्त चरबी वेगाने कमी होण्यास मदत होते.
गरम पाणी आणि गूळ एकत्र प्यायल्याने यकृतामधील आणि रक्तातील हानिकारक टॉक्सिन्स शरीराबाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा देखील चमकदार होते.
गुळात असणारे अँटी-ऑक्सिडंट्स आणि झिंक शरीराला ऋतू बदलांमुळे होणाऱ्या आजारांपासून वाचवतात. हे मिश्रण शरीराला दिवसभर ऊर्जावान ठेवण्यास मदत करते.