Sanjana Hebbalkar
आजा 30 ऑगस्ट म्हणजे आज 'सुपर ब्लू मून' आकाशात दिसणार आहे म्हणतात. मात्र हे असं का होतं. चंद्राशी संबंधित या शब्दाचा अर्थ काय आहे?
जेव्हा चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो आणि पौर्णिमा येतो तेव्हा त्याला सुपरमून म्हणतात. यावेळी चंद्राच्या आकार बदलत नाही. किंवा रंगदेखील बदलत नाही.
जेव्हा पौर्णिमा एका महिन्यात दोनदा येते तेव्हा त्याला 'ब्लू मून' म्हणतात. म्हणजेच1 ऑगस्ट 2023 रोजी पौर्णिमा होती आणि दुसरी पौर्णिमा 30 ऑगस्ट रोजी आहे.
हे वर्षातून २ ते ३ वेळा होतं. त्यामुळे जेव्हा पूर्ण मून, ब्लू मून आणि सुपरमून एकत्र येतात तेव्हा त्याला सुपरब्लू मून असं म्हणतात.
सुपर ब्लू मून पाहण्याची उत्तम वेळ म्हणजे सूर्यास्तानंतरची. यावेळी सुर्य सर्वात सुंदर दिसतो. भारतात आज मध्यरात्री 12 वाजून 2 मिनिटांनी चंद्राचं मोठं रुप पाहायला मिळणाऱ आहे.
ज्याप्रमाणे ब्लूमून, सुपरमून असतो त्याप्रमाणे रेडमूनदेखील असतो. ज्यादिवशी चंद्र काहीवेळासाठी संपूर्ण लाल झालेला असतो तेव्हा त्याला रेडमून म्हणतात
2023 मध्ये, जगाला एकूण चार सुपरमून दिसणार आहेत, त्यापैकी बक मून 3 जुलै तर आणि स्टर्जन मून 2 ऑगस्ट रोजी दिसले आहेत. ३० ऑगस्टला दिसणारा चंद्र ब्लू सुपरमून तर. यानंतर २९ सप्टेंबरला हार्वेस्ट सुपरमून दिलेल असे म्हटले जाते.