Team Agrowon
खानदेशात सूर्यफूल पिकाची लागवड पूर्ण झाली आहे.
यंदा जळगाव जिल्ह्यात सुमारे ३५० तर धुळे व नंदुरबारात मिळून सुमारे १५० हेक्टरने लागवड वाढली आहे.
एकूण लागवड तीन हजार हेक्टरपर्यंत झाली आहे. मागील हंगामात सूर्यफूल लागवड घटली होती. परंतु यंदा लागवड काहीशी वाढली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी हरभरा, कापूस पीक आटोपल्याने सूर्यफूल पेरणीस पसंती दिली आहे.
सूर्यफुलाची लागवड जळगाव जिल्ह्यात जामनेर, जळगाव, चोपडा, पाचोरा भागात अधिक झाली आहे. धुळ्यात शिरपूर तालुक्यात अधिक लागवड आहे.
तर नंदुरबारात शहादा, तळोदा व नवापूर तालुक्यांत सूर्यफूल पीक बऱ्यापैकी आहे. जळगाव जिल्ह्यातील लागवड सुमारे २२०० हेक्टर असल्याचा अंदाज आहे.