Sugarcane Crushing : यंदाच्या हंगामात किती ऊस गाळपासाठी उपलब्ध ?

टीम ॲग्रोवन

नगर विभागात यंदा दोन लाख ३४ हजार ५३३ हेक्टरवर ऊस उपलब्ध आहे. साधारणपणे ७६.९३ प्रतिहेक्टरी उत्पादकता ग्रहित धरुन १ कोटी ८१ लाख ५५ हजार टन ऊस उत्पादित होईल.

(Sugar Mills) त्यातील १५ टक्के ऊस विविध कारणाने कमी करून १ कोटी ६० लाख टन ऊस गाळपासाठी (Sugarcane Crushing) उपलब्ध होणार असल्याचा अंदाज आहे.(Sugar Production)

नगर जिल्ह्यात १ कोटी ३६ लाख ३५ हजार टन ऊस असेल, असे सांगण्यात आले. नगर विभागात नगर जिल्ह्यात २३ तर नाशिक जिल्ह्यात ५ असे २८ साखर कारखाने आहेत.

त्यात १८ सहकारी तर १० खासगी साखर कारखाने आहेत. यंदा विभागात २ लाख ३४ हजार ५३३ हेक्टरवर ऊस गाळपासाठी उभा आहे.

प्रादेशिक सहसंचालक (साखर) कार्यालयाने निश्चित केलेल्या हेक्टरी ७६.९३ टन उत्पादकतेनुसार १ कोटी ८१ लाख ५५ हजार ऊस उपलब्ध होईल.

साखर कारखान्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारा, बेणे, रसवंती आदींसाठी साधारण १५ टक्के म्हणजे ३५ हजार हेक्टर क्षेत्रावरील ऊस गाळपातून कमी होईल.

नगर विभागात गतवर्षीच्या हंगामात सुरवातीच्या काळात साखर कारखान्यांनी कार्यक्षेत्राएवजी बाहेरच्या कार्यक्षेत्रातील ऊस आणला.

नंतर मात्र कार्यक्षेत्रातच ऊस अतिरिक्त झाला. ऊसतोडणीचा कालावधी संपून गेला तरी चार ते पाच महिने ऊस तोडणी करण्याची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली.