Team Agrowon
तिळाच्या बियाण्यात सर्वसाधारणपणे तेलाचे प्रमाण ५० टक्के, तर प्रथिने २५ टक्क्यांपर्यंत असतात.
तिळाच्या पेंडीत प्रथिने ३५ ते ४५ टक्के आणि कॅल्शिअम, फॉस्फरस यांसारखे खनिज पदार्थ मुबलक प्रमाणात असल्याने कोंबडी व पशुखाद्यासाठी उत्तम ठरते.
तीळ हे अत्यंत नाजूक व संवेदनशील पीक आहे. तापमान, सूर्यप्रकाश आणि पावसाचे वितरण यांचा पीकवाढीवर परिणाम होतो.
उगवणीनंतर किमान १५ अंश सेल्सिअस, कायिक वाढीसाठी २१ ते २६ अंश से., तर फूल व फुलधारणा काळात २६ -३२ अंश से. तापमान आवश्यक आहे.
तापमान ४० अंश से.च्या वर गेल्यास फुलगळ होते. पीक फुलांवर असताना अतिपावसामुळे फुलांची गळ होते.
वाणांनुसार फुलधारणेची सुरुवात प्रकाशाच्या कालावधीला संवेदनशील असते. प्रकाशाचा कालावधी जास्त असल्यास बियाण्यातील तेलाचे प्रमाण वाढते, तर प्रथिनांचे कमी होते.