Pushpak Viman : भारताने बनवलं स्वदेशी अवकाशयान, 'पुष्पक' विमान कसे असेल

sandeep Shirguppe

पुष्पक स्वदेशी अवकाशयान

भारताचे पहिले स्वदेशी अवकाशयान 'पुष्पक'ची सलग दुसऱ्यांदा यशस्वी लैंडिंग करण्यात आली आहे.

Pushpak Viman | agrowon

इस्त्रो

इस्रोने शुक्रवारी (ता. २२) कर्नाटकातील चित्रदुर्ग येथील विमान परीक्षण धावपट्टीवर 'पुष्पक'ची यशस्वी चाचणी घेतली.

Pushpak Viman | agrowon

पुष्पक १

रियुजेबल लाँच व्हेईकल लौंडग मालिकेतील हा दुसरा प्रयोग होता. मागील वर्षीच 'पुष्पक-१' (आरएलव्ही-एलईएक्स-१) मोहिमेनंतर 'पुष्पक-२' ची यशस्वी चाचणी घेण्यात आली.

Pushpak Viman | agrowon

'चिनूक' हेलिकॉप्टर

भारतीय वायुसेनेच्या 'चिनूक' हेलिकॉप्टरमधून 'पुष्पक'ला पृथ्वीपासून साडेचार किलोमीटर अंतरावरून सोडण्यात आले.

Pushpak Viman | agrowon

पुष्पक विमान

आकाशात काही वेळ स्थिर झाल्यानंतर 'पुष्पक' यान विमानासारखे धावपट्टीवर उतरले.

Pushpak Viman | agrowon

आकाशातील आव्हान

आकाशातील आव्हानात्मक स्थितीत 'पुष्पक'ने स्वतःला नियंत्रित केले तसेच जमिनीवर धावपट्टीचा अंदाज घेत स्वयंचलित पद्धतीने अचूक लैंडिंग केले, असे 'इस्रो'कडून सांगण्यात आले.

Pushpak Viman | agrowon

स्वदेशीकरणाची प्रक्रिया पूर्ण

स्वदेशीकरणाची प्रक्रिया पूर्ण या दुसऱ्या मोहिमेत 'इस्रो'च्या दिशादर्शन आणि नियंत्रण प्रणालीच्या यशस्वीतेवर पुन्हा शिक्कमोर्तब झाले आहे.

Pushpak Viman | agrowon

लैंडिंग गिअर

लैंडिंग गिअर आणि अवकाशातून परतणाऱ्या यानाच्या उच्च वेगाला स्वयंचलित लँडिंग करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या प्रणालीचे स्वदेशीकरण पूर्ण झाले आहे.

Pushpak Viman | agrowon

दीडपट मोठे 'पुष्पक'

'इस्रो' भविष्यात यापेक्षा दीडपट मोठ्या 'पुष्पक' यानाला अवकाशात पाठविणार आहे. असे संशोधकांकडून सांगण्यात आले.

Pushpak Viman | agrowon