Malshej Ghat : माळशेज घाट पर्यटकांचा स्वर्गच, सुभेदार धबधबा खुणावतोय...

sandeep Shirguppe

कल्याण नगरमधील माळशेज घाट

महाराष्ट्राला पश्चिम घाटाचे मोठे सौंदर्य लाभलं आहे. यापैकी माळशेज घाट हा त्यातील उत्तम नमुना आहे. कल्याण-नगर रस्त्यावर असलेल्या या घाटाचा पावसाळ्यात आनंद घेण्याची मजाच वेगळी आहे.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

हिरवागार निसर्ग आणि धबधबे

सह्याद्रीच्या कड्याकपारीतून जाताना या हिरव्यागार निसर्गात धबधबे, किरकिर किडे, दुर्मीळ फुले, विदेशी पक्षी दरीतून वर येणारे दाट धुके, या माळशेज घाटात पहायला मिळतात.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

माळशेजची अनुभूती वेगळीच

माळशेज घाट हा पावसाळ्यातील प्रवाशांचे निवासस्थान म्हणून ओळखला जातो. दरवर्षी माळशेजवरील अनुभूती ही निराळीच ठरते.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

फेसाळणारे धबधबे मनमोहून टाकतात

मुसळधार पावसामुळे या घाटातील हलकीशी थंडी, आणि फेसाळणारे धबधबे हे पर्यटकांना मोहून टाकतात. जणू हाच स्वर्ग आहे, याची, अनुभूती अनुभवायला मिळते.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

सुभेदार धबधबा

सिद्धगडावरील धबधबे आणि पर्यटकांना आकर्षित करणारा सुभेदार धबधबा पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. पावसाळ्यात ट्रेकर्स तसेच पर्यावरण प्रेमींचे सिद्धगड हे प्रसिद्ध असे ठिकाण आहे.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

माळशेज घाटातील सिद्धगड

याचबरोबर अनेक तरूण सध्या बाईकने जाणे पसंद करतात. माळशेज घाटानंतर सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये सिद्धगड हे एक निसर्गाने नटलेले इतिहासकालीन ठिकाण आहे.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

बस आणि बाईकने जाण्याची मजाच वेगळी

मुंबई-ठाणे-कल्याण-मुरबाड- टोकावडे मार्गे खासगी वाहनांनी माळशेज घाट गाठता येते. तर दुसरा पर्यायी मार्ग म्हणजे कल्याणपर्यंत रेल्वेने जाणे आणि तेथून बस अथवा खासगी वाहनांनी माळशेज गाठता येते.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

पुण्यातून अगदी जवळ

पुण्याहून चाकण-राजगुरूनगर-पेठ -मंचर-नारायणगाव-जुन्नरमार्गे माळशेजला जाता येते. वाहनाऐवजी पायी घाट चढत असताना पर्यटकांना आपल्या आवडीनुसार छोट्या-मोठ्या धबधब्यांचा मनसोक्त आनंद लुटता येतो.

Malshej Ghat Waterfalls | agrowon

हे आहेत मार्ग

माळशेज घाट मुंबईपासून १२६ कि.मी. व कल्याणपासून ८५ कि.मी अंतरावर असून पुण्यापासून तो ११८ कि.मी लांब आहे.

Malshej Ghat Waterfalls | agrowon
tomato | agrowon
आणखी पाहा...