Anil Jadhao
स्ट्राॅबेरी हे राज्यात विशिष्ट भागातच घेतले जाणारे पीक आहे. थंड वातावरणातले पीक म्हणून स्ट्राॅबेरी ओळखले जाते.
आता इतर भागातही आता स्ट्राॅबेरी लागवडीचे प्रयोग सुरु आहेत.
यंदा स्ट्राॅबेरी पिकाला अपेक्षित थंडी अजूनही पडली नाही.
किमान तापमान जास्त असल्यानं पिकावर परिणाम होत असल्याचं शेतकरी सांगत आहेत.
सध्या काही बाजारात स्ट्राॅबेरीची आवक होतेय. तर दर प्रतिक्विटंल १० हजार ते १६ हजार रुपयांच्या दरम्यान आहे.
पुढील काळात स्ट्राॅबेरीची आवक वाढण्याचा अंदाज असल्याचं जाणकारांनी सांगितलं.