Anuradha Vipat
यंदाच्या नवरात्रीत आणि गरबा नाईटला जर तुम्हाला गर्दीत सर्वात वेगळे आणि आकर्षक दिसायचे असेल, तर मिरर वर्क लेहेंगाहा एक परफेक्ट पर्याय आहे.
काचांचे डिझाईन आणि त्यावर पडणारा दिव्यांचा प्रकाश यामुळे हा लेहेंगा गरबा खेळताना प्रचंड उठून दिसतो.
गुजराती बांधणी किंवा वेगवेगळ्या रंगांच्या पट्ट्यांवर केलेले मिरर वर्क गरब्यासाठी कधीही आऊट ऑफ फॅशन होत नाही.
जर तुम्हाला पारंपारिक लुकला मॉडर्न टच द्यायचा असेल, तर मिरर वर्क असलेल्या घेरदार लेहेंग्यावर शॉर्ट पेपलम स्टाईल ब्लाउज ट्राय करा.
एकाच रंगाचा लेहेंगा आणि त्यावर पूर्ण काचांचे नक्षीकाम सध्या फॅशनमध्ये खूप इन आहे.
हाताने केलेल्या कच्छी धाग्यांच्या एम्ब्रॉयडरीमध्ये जड काचा बसवलेला हा लेहेंगा अस्सल पारंपारिक गरबा लुक देतो.
जर तुम्हाला गरबा स्टेप्स करताना जड कपडे नको असतील, तर जॉर्जेट किंवा शिफॉन फॅब्रिकवर फॉइल मिरर वर्क असलेला लेहेंगा निवडा.