Team Agrowon
उन्हाळ्याच्या दिवसांत सतत तहान लागते. तहान भागविण्यासाठी दुपारच्या वेळी नारळ पाणी प्यावे.
कफ, वात, पित्त प्रकृतीच्या व्यक्तीसाठी नारळ व नारळपाणी हे गुणकारी मानले जाते.
नारळामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे नारळाला पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोला आहार म्हटले जाते.
नारळात जीवनसत्त्वे, अनेक प्रकारची खनिजे, क्षार, प्रथिने, स्निग्धांश मुबलक प्रमाणात असतात
नारळाचे दूध शक्तीवर्धक मानले जाते. नारळाच्या दुधाचे सेवन केल्यास बराच काळ भुकेवर नियंत्रण राहते.
काही लोकांची त्वचा निस्तेज व कोरडी असते. त्यांनी नारळाच्या पाण्यामध्ये दुधावरील थोडी साय मिसळून हळुवार हाताने मालिश करावी. त्वचा उजळते.
हृदयाचे आरोग्य राखण्यासाठी नारळ उपयुक्त असतो.
Soil Ploughing : चांगल्या फायद्यासाठी नांगरणी केंव्हा कराल?