Anuradha Vipat
आजारांपासून दूर राहून निरोगी आणि दीर्घायुष्य जगण्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीत आणि आहारात काही मूलभूत बदल करणे अत्यंत आवश्यक आहे.
आहारातून मैदा, पांढरा भात आणि साखरेचे प्रमाण कमी करा. त्याऐवजी ज्वारी, बाजरी, ओट्स आणि नाचणी यांसारख्या संपूर्ण धान्यांचा समावेश करा.
आहारात रोज किमान एक ताजे फळ आणि रंगीबेरंगी पालेभाज्या ठेवा.
आठवड्यातून किमान १५० मिनिटे किंवा दररोज ३० मिनिटे मध्यम स्वरूपाचा व्यायाम करा.
एकाच जागी सलग तासनतास बसून राहणे टाळा. व्यायामामुळे वजन नियंत्रित राहते आणि मधुमेह व उच्च रक्तदाबाचा धोका टळतो.
शरीराच्या आणि मेंदूच्या री-चार्जिंगसाठी दररोज रात्री ७-८ तास गाढ झोप घेणे आवश्यक आहे.
जेवणापूर्वी आणि बाहेरून आल्यानंतर हात स्वच्छ धुवावेत. यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका मोठ्या प्रमाणावर कमी होतो.