Anuradha Vipat
आल्याच्या रसात थोडे मध मिसळून घेतल्यास घशाची खवखव आणि कोरडा खोकला त्वरित कमी होतो.
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात चिमूटभर हळद आणि काळी मिरी पूड टाकून प्यायल्याने शरीरात उब राहते आणि संसर्ग रोखला जातो.
तुळशीची पाने, आले, काळी मिरी आणि दालचिनी पाण्यात उकळून तयार केलेला काढा पिल्यास रोगप्रतिकारशक्ती वाढते.
साध्या गरम पाण्याची किंवा त्यात थोडे निलगिरी तेल टाकून वाफ घेतल्यास बंद झालेले नाक मोकळे होते.
कोमट पाण्यात थोडे मीठ टाकून दिवसातून २-३ वेळा गुळण्या केल्यास घशातील जंतुसंसर्ग आणि सूज कमी होते.
लसणाची पाकळी तुपात परतून खाल्ल्यास किंवा वरण-भाजीत लसणाचा वापर केल्यास शरीरातील जंतूंचा नाश होण्यास मदत होते.
मधामध्ये चिमूटभर काळी मिरी पूड मिसळून चाटण घेतल्यास छातीतील कफ बाहेर पडण्यास मदत होते.