Swapnil Shinde
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वाडी-वस्तीवर लोकांना सेवा देणाऱ्या एसटी बस सेवाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत.
अकोल्यातील पीयुष राऊत या तरुणाने एसटी बसची हुबेहूब दिसणारी प्रतिकृती बनवली.
त्याने नुसते मॉडेल बनवले नाही तर ती प्रतिकृती खऱ्या बससारखी धावते देखील.
तेही स्वतः हाताने प्रत्येक पार्ट बनवून त्यांना यंत्राद्वारे प्रत्यक्ष गती देऊन प्रत्येक मॉडेल उभे करणे हा छंद जोपासला.
त्याने बनवलेली लालपरीची प्रतिकृतीची एसटी महामंडळाने दखल घेतली असून ती शासकीय बैठकीत मुख्यमंत्र्यांसमोर पुढे ठेवण्यात आली.
त्याच्या प्रतिकृतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले.
ही बस इलेक्ट्रिक असून तिला मोटार देखील बसवली आहे. ही बस बनवण्यासाठी सन बोर्ड कागदाचा वापर केला असून त्यावर एसटी बसचा लोगोही लावला आहे.
हे बस मॉडेल बनवण्यासाठी पीयुषला तब्बल दोन महिन्यांचा कालावधी लागला असून १२ हजार रुपये खर्च