Anuradha Vipat
तुमच्या स्वयंपाकघरातील मसाले आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. मसाल्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात.
आल्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म असतात. ते पचन सुधारण्यास, मळमळ कमी करण्यास आणि रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करतात.
जिरे पचन सुधारण्यास, रक्तातील साखर नियंत्रित करण्यास आणि वजन कमी करण्यास मदत करतात.
दालचिनी रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
काळी मिरी पचन सुधारते आणि शरीरात पोषक तत्वांचे शोषण वाढवते.
वेलचीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. ती पचन सुधारण्यास आणि रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यास मदत करते.
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, जो शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे.