Team Agrowon
रमजान ईदप्रमाणेच मुस्लिम धर्मीयांमध्ये बकरी ईद सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.
रमजान ईद झाल्यानंतर ७० दिवसांना बकरी ईद साजरी केली जाते.
ईज-ऊल-अदाह म्हणजेच बकरी ईद हा सण मुस्लिम धर्मामध्ये त्यागाचा दिवस म्हणून साजरा केला जातो.
मुस्लिम धर्मीयांमध्ये रमजान ईदनंतर साजरा होणार बकरी ईद हा दुसरा मोठा सण आहे.
बकरी ईद दिवशी मुस्लिम बांधव बकऱ्यांची कुर्बानी देतात. कुर्बानीसाठी लागणाऱ्या बोकडांना या दिवशी मोठी मागणी असते.
बकरी ईदला कुर्बानीसाठीच्या बकऱ्यांसाठी खरेदीदार कितीही किंमत मोजायला तयार असतात.
बकरी ईदसाठी उंच, तंदुरूस्त बोकडांची निवड खरेदीदारांकडून केली जाते. हे बोकड दिसायलाही रुबाबदार असतात.