Soybean Market : सोयाबीन बाजारात आठवडाभर काय घडलं?

Anil Jadhao 

चालू आठवड्यात सोयाबीन बाजारात काहीसे चढ उतार राहीले. या आठवड्यात अर्जेंटीना चर्चेत आलं होतं. अर्जेंटीनातील महत्वाच्या सोयाबीन उत्पादक भागांमध्ये कमी पाऊस होता. त्यामुळं पिकाला फटका बसतो आहे. 

Soybean

चालू आठवड्यात सोयाबीन बाजार तसा स्थिरच होता. आठवडाभर सोयाबीनचे व्यवहार ५ हजार २०० ते ५ हजार ५०० रुपयांच्या दरम्यान झाले.

दुसरीकडे बाजारातील आवकही कमी होती. डिसेंबर महिन्यात एरवी दिवसाला ४ ते ५ लाख क्विंटलच्या दरम्यान आवक  होते. मात्र सद्या केवळ २ ते अडीच लाख टन आवक आहे.

सीबाॅटवर सोमवारी सोयाबीनचा  बाजार १४.६३ डाॅलर प्रतिबुशेल्सवर सुरु झाला. म्हणजेच ४ हजार ४५० रुपयांवर बाजार खुला झाला. तर आठवडाभर दरात चढ उतार होत शुक्रवारी बाजार १४.८० डाॅलर म्हणजेच ४ हजार ५५० रुपयांवर बंद झाला.

पुढील आठवड्यात मात्र सोयाबीन दराला आधार मिळू शकतो. इंडोनेशियानं जोनावरीपासून जैवइंधनात पामतेलाचा वापर वाढविण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळं पामतेलाचे दर वाढू शकतात. यामुळे सोयाबीनचे दरही सुधारतील.

पुढील आठवडाभर अर्जेंटीनात पाऊस पडला नाही तर येथील उत्पादनात जास्त घट होईल. यामुळेही सोयाबीन बाजाराला आधार मिळू शकतो, असं सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी सांगितलं.

क्लिक करा