Team Agrowon
अर्जेंटीनामध्ये यंदा दशकातील गंभीर दुष्काळ पडला आहे. त्यामुळे तेथील सोयाबीन उत्पादनात मोठी घट झाली आहे.
अमेरीकेच्या कृषी विभागाने (USDA)अर्जेंटीनामधील उत्पादन ३३० लाख टनांवर स्थिरावण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.
तसेच सोयातेल आणि सोयापेंड उत्पादनही कमी राहील, असे USDA चे म्हणणे आहे.
अर्जेंटीना सरकारने मात्र यंदा ३४० लाख टन सोयाबीन उत्पादनाचा अंदाज जाहीर केला आहे. तर अर्जेंटीनाची सोयाबीन आयात काहीशी वाढू शकते, असाही अंदाज आहे.
अर्जेंटीनात मागील हंगामात ४१० लाख टन सोयाबीन उत्पादन झाले होते.
हंगामाच्या सुरुवातील ५१० लाख टन उत्पादनाचा अंदाज होता. मात्र दुष्काळामुळे अर्जेंटीनातील सोयाबीन उत्पादन घटले.
युएसडीएने आपला अहवाल सादर केल्यानंतर सीबाॅटवर सोयाबीन आणि सोयापेंडचे दर सुधारले होते.