Anuradha Vipat
हृदयावरील सूज टाळण्यासाठी काही महत्त्वपूर्ण टिप्स खालीलप्रमाणे दिल्या आहेत. या टिप्स नक्कीचं तुमच्या उपयोगी येतील
संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. फळे, भाज्या, डाळ आणि तृणधान्ये यांचा समावेश करा.
प्रक्रिया केलेले अन्न आणि जास्त प्रमाणात चरबी असलेले पदार्थ टाळा.
लठ्ठपणा किंवा जास्त वजन असल्यास ते कमी करणे महत्त्वाचे आहे. वजन कमी केल्याने हृदयावरचा ताण कमी होतो.
धूम्रपान आणि मद्यपानामुळे हृदयावर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे हे दोन्ही टाळणे आवश्यक आहे
योग्य प्रमाणात कोलेस्ट्रॉल ठेवल्याने हृदयावरचा ताण कमी होतो.
मधुमेहाचे नियंत्रण ठेवल्याने हृदयावरचा ताण कमी होतो.