Team Agrowon
कडक उन्हात पेरु बागेला जर पाणी कमी पडत असेल तर फूलगळ, फळगळ होते. लहान फळे पिवळी पडून गळतात.
झाडाची पाने सुकतात, करपतात. बागेतील उघडी पडलेली फळे कडक उन्हामुळे अकाली पिवळी पडतात.फळांमध्ये फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
तापमान वाढीमुळे फळांची गुणवत्ताही खालावते. अशा वेळी लक्षणे ओळखून लगेच उपाय करावे लागतात.
उपाय करताना पेरु बागेतील काळी पडलेली, वाळलेली फळे आणि झाडाखाली गळून पडलेली फळे गोळा करून नष्ट करावीत.
झाडातून होणारं पाण्याचं बाष्पीभवन कमी होण्यासाठी केओलिनच्या ८ टक्के द्रावणाची फवारणी करावी. केओलीनची फवारणी केल्यामुळे पिकाच्या पानांवर तसच फळांवर पातळ पांढरा थर तयार होतो.
हा पांढऱ्या रंगाचा थर तीव्र सूर्यकिरणे पानांत किंवा फळांत जाऊ न देता तो वातावरणात परावर्तित करतो. त्यामुळे पानांमधून होणारे बाष्पोत्सर्जन २५ ते ३० टक्क्यांनी कमी होतं. कमी पाण्यातही पीक तग धरुन राहतं.
दुष्काळी परिस्थितीत झाडे तग धरून राहण्यासाठी १ टक्के पोटॅशिअमची फवारणी केली तरी चालते. तसेच हलकी छाटणी करून झाडाचा आकार मर्यादित ठेवावा. त्यामुळे झाडाची पाण्याची गरज कमी होते.
Karvand Health Benefits : रानमेवा डोंगरची काळी मैना आहे पोषक घटकांचा खजिना