Anuradha Vipat
मॅच्युअर व्यक्ती वयाने मोठी नसते तर तिचे वागणे आणि विचार करण्याची पद्धत इतरांपेक्षा वेगळी असते.
धावपळीच्या आणि मानसिक तणावाच्या काळात खालील गुणांवरून तुम्ही मॅच्युअर माणसांची लक्षणे ओळखू शकता
मॅच्युअर व्यक्ती समोरच्याचे म्हणणे शांतपणे आणि पूर्णपणे ऐकून घेते.
मॅच्युअर व्यक्ती छोट्या-छोट्या गोष्टींवर वाद घालत बसत नाही.
मॅच्युअर माणसे कधीही आपल्या चुका इतरांवर ढकलत नाहीत
दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवल्याने दुःख मिळते, हे त्यांना उमजलेले असते.
परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी नसते, हे ते स्वीकारतात.