Anuradha Vipat
उन्हाळ्यात दूध पिणे आरोग्यासाठी घातक नाही, उलट ते योग्य पद्धतीने घेतल्यास फायदेशीरच ठरते.
वाढत्या उष्णतेमुळे दुधाचे सेवन करताना काही खबरदारी घेणे आवश्यक आहे.
दुधामध्ये सुमारे ९०% पाणी असते, जे शरीरातील पाण्याची पातळी टिकवून ठेवण्यास मदत करते.
उन्हाळ्यात अनेकांना पित्ताचा त्रास होतो. अशा वेळी एक ग्लास थंड दूध प्यायल्याने पोटात थंडावा मिळतो.
यात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, प्रथिने आणि व्हिटॅमिन बी-१२ सारखी महत्त्वाची पोषक तत्वे असतात जी शरीराला ऊर्जा देतात.
उष्णतेमुळे दूध लवकर नासते. असे दूध प्यायल्याने अन्नातून विषबाधा उलटी किंवा जुलाब होऊ शकतात.
कच्चे दूध पिणे टाळावे, कारण त्यात हानिकारक बॅक्टेरिया असू शकतात. दूध किमान एकदा तरी उकळून घ्यावे.