Anuradha Vipat
उन्हाळ्यात पचनसंस्था आधीच संवेदनशील झालेली असते, अशा वेळी जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने शरीराला विविध आरोग्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
मांसाहारी पदार्थ जड आणि पचायला कठीण असतात. यामुळे उन्हाळ्यात अपचन, गॅस, ॲसिडिटी आणि पोट फुगणे यांसारखे त्रास होऊ शकतात.
मांसामध्ये प्रथिने आणि चरबी जास्त असते. हे पदार्थ पचवताना शरीरात उष्णता निर्माण होते, ज्यामुळे शरीराचे तापमान अधिक वाढू शकते.
उन्हाळ्यात गरम वातावरणामुळे मांसाहारी पदार्थ लवकर खराब होतात . अशा वेळी उलट्या, जुलाब आणि पोटाचे विकार होऊ शकतात.
अति मांसाहार आणि मसाल्यांमुळे शरीरातील उष्णता वाढून त्वचेवर पुरळ खाज किंवा दाह होऊ शकतो.
उन्हाळ्यात जास्त नॉनव्हेज खाल्ल्याने चिडचिडेपणा आणि राग वाढू शकतो
मांसाहारी पदार्थ पचवण्यासाठी शरीराला अधिक पाण्याची गरज असते. पुरेसे पाणी न पिल्यास डिहायड्रेशनचा धोका वाढतो.