Team Agrowon
ज्वारी, बाजरी, नाचणी, भगर यासारख्या पौष्टिक तृणधान्य पिकाची काही प्रमाणात का होईना लागवड करावी.
खरिपाची परभणीशक्ती हे ज्वारीचे सुधारित वाण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने विकसित केले आहे.
त्याचबरोबर राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प छत्रपती संभाजीनगरनिर्मित एएचबी १२०० या बाजरी वाणाचेही आहारात मोठे महत्त्व आहे.
त्यामुळे शेतकऱ्यांनी या पिकाच्या वाणाची लागवड करावी. बाजरी आणि ज्वारी या पिकाचे महत्त्व देशाच्याच नव्हे तर जगाच्या लक्षात आले आहे.
त्यामुळे या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाचे महत्त्व लक्षात घेता या पिकाची शेतकऱ्यांनी लागवड करावी.
एकविध पीक पद्धतीचे धोके वाढत आहेत. किड रोगाचा प्रादुर्भाव जाणवत असून उत्पादन खर्च वाढत आहे. यासाठी पीकफेरपालट म्हणून अन्नधान्य पिकाची लागवड येत्या खरिपात शेतकरी बांधवानी करावी.