अभिजीत डाके
लहान मोठ्या मिळून ३५ गायी, खोंडे आणि कालवडी पाटील यांच्या दारात डौलात उभे असलेले दिसतात.
कालवड झाली ती सांभाळ करायचा आणि खोंडे झाली की विक्री करायची अशी पध्दत ठेवली. जित्राबं म्हणजे आपली पोरंच आहेत असे शिवाजी समजतात. त्याप्रमाणेच त्यांचा सांभाळ केला जातो.
खिलार जनावर म्हटलं की आटपाडी आणि जत हे तालुके आपसूक डोळ्यासमोर येतात. त्यामुळे जातिवंत खोंड, बैल हवा असले तर इच्छुक इथल्या शेतकऱ्यांच्या दारापर्यंत येतातच.
सोलापूर, पुणे, सातारा, कर्नाटक या ठिकाणाहून शर्यतीचे शौकीन देखील इथपर्यंत येतात आणि खरेदी करून जातात.
सर्वसाधारणपणे दोन ते तीन महिने झाल्यानंतर खोंड शर्यतीचा आहे की शेती मशागतीसाठी आहे याची चपापणी होते.