Team Agrowon
विधानपरिषद आणि राज्यसभा निवडणुकीचा मुहूर्त साधत शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 20 जून रोजी समर्थक आमदारांसह बंड केले.
शिवसेनेच्या अभूतपूर्व राजकीय नाट्यनंतर 29 जून रोजी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 30 जून रोजी एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या मदतीने सरकार बनवले.
एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदाची तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
शिवसेनेच्या ४० आमदार आणि १३ खासदारांनी एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व स्विकारल्याने निवडणूक आयोगाने शिंदेंच्या बाजूने निर्णय दिला. शिवसेना आणि धनुष्यबाण एकनाथ शिंदे यांना मिळाला.
१० महिन्यांपूर्वी १८ मंत्र्यांचा समावेश करीत मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. पण दुसरा मंत्रिमंडळ विस्तार आणि महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्यावतीने‘देशात नरेंद्र मोदी, राज्यात एकनाथ शिंदे’ अशी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. त्यामुळे शिंदे-फडणवीसांमध्ये सुप्त संघर्ष असल्याचे दिसून आले. त्यावरून दोन्ही पक्षांकडून सारवासारव झाली.
सरकारने मागील एक वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले. त्यामध्ये महिलांना एसटी प्रवासात सूट, १ रुपयात पीक विमा, शेतकऱ्यांना नमो योजनेतून निधी , तसेच रखडलेल्या विकास कामांना गती देण्याचा प्रयत्न केला.