Anuradha Vipat
शतावरी कल्प हे आयुर्वेदिक औषध असून ते प्रामुख्याने महिलांच्या आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी मानले जाते.
प्रसूतीनंतर ज्या मातांना पुरेशा प्रमाणात दूध येत नाही, त्यांच्यासाठी शतावरी कल्प रामबाण उपाय आहे.
हे महिलांच्या शरीरातील इस्ट्रोजेन सारख्या महत्त्वाच्या संप्रेरकांचे प्रमाण संतुलित ठेवते.
गरोदरपणापूर्वी आणि गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्ल्याने हे घेतल्यास गर्भाशयाचे स्नायू मजबूत होतात आणि गर्भधारणेची क्षमता सुधारते.
वयाच्या ४५ ते ५० दरम्यान मासिक पाळी बंद होताना महिलांना होणारा त्रास, अचानक अंगाची जळजळ होणे आणि चिडचिड होणे या समस्या शतावरी कल्पामुळे कमी होतात.
शतावरी कल्प हे उत्तम 'बल्य' औषध आहे. हे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करून थकवा कमी करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
१ ते २ चमचे शतावरी कल्प दिवसातून दोनदा घेता येते. हे सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधासोबत मिसळून घ्यावे