Team Agrowon
धुळे जिल्ह्यातील कुसुंबा येथील प्रगतिशील शेतकरी किरण शिंदे यांनी बाजरीच्या तुर्की या देशी बाजरी वाणाची लागवड केली आहे.
शिंदे यांनी आपल्या पंधरा एकर क्षेत्रात बाजरीच्या या वाणाची लागवड केली आहे. या वाणाचे वैशिष्ट्य म्हणजे याच्या कणसाचा आकार सुमारे तीन ते चार फूट आहे.
शिंदे यांचा मुलगा कुणाल याने कृषीचे शिक्षण घेतले असून शिंदे पितापुत्र आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करत असतात. कुणालने तुर्कस्तानातून बाजाराच्या वाणाचे बियाणे मागविले होते.
नुकतीच शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेवून या वाणाच्या बाजरीची माहिती दिली. यावेळी बाजरीचे भले मोठे कणीस पाहून शरद पवारही अवाक झाले.
शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि बाजरीच्या वाणाबाबतची माहिती दिली.
राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही जाणून या विशिष्ठ वाणाच्या बाजरीची माहिती जाणून घेतली.
राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनीसुध्दा शिंदे यांच्याकडून पिकाची माहिती घेत ते करत असलेल्या शेतीतील प्रयोगाबद्दल माहिती घेतली.
शिंदे यांनी त्यांच्या शेतात लावलेल्या बाजरीचे पीक पाहण्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी गर्दी करत आहेत.
यशवंतराव चव्हाण सेंटर येथे उपस्थित असणाऱ्या अनेकांनी बाजरीचे चार फुटाचे कणीस पाहून आश्चर्य व्यक्त केले. तसेच अनेकांना फोटो काढण्याचा मोह आवरला नाही.