Team Agrowon
अमेरिकेच्या लॉस एंजलिस, कॅलिफोर्नियामध्ये विविध प्रजातींच्या वनस्पतींचा समावेश असलेले बोटॅनिकल गार्डन साकारण्यात आले आहे.
साऊथ कोस्ट बोटॅनिक गार्डन असे या उद्यानाचे नाव असून ते साठ वर्षांपूर्वी हे उद्यान तयार करण्यात आले आहे.
हे उद्यान ८७ एकर क्षेत्रात पसरलेले असून यामध्ये विविध प्रजातींच्या दिड लाख वनस्पतींचे जतन केले आहे.
तसेच या उद्यानामध्ये मानवाकडून समुद्रात फेकल्या जाणाऱ्या प्लास्टिक कचऱ्यापासून सुंदर अशी शिल्पे साकारण्यात आली आहेत.
Washed Ashore - Art To Save The Sea या सेवाभावी संस्थेने समुद्रकिनाऱ्यावर सापडलेल्या प्लास्टिकच्या कचऱ्यापासून सुंदर, कलात्मक शिल्पे साकारली आहेत.
प्लास्टिकचा वापरणाऱ्यांच्या सवयीमध्ये सकारात्मक बदल घडविण्याच्या उद्देशाने ही शिल्पे संस्थेने साकारली आहेत.
समुद्रातील जीवांचे प्लास्टिक कचऱ्यामुळे अस्तित्व धोक्यात आले आहे. त्यामुळे प्लास्टिक वापरापासून लोकांना परावृत्त करण्यासाठी ही संस्था प्रबोधन करत आहे.